मी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवर पोस्ट टाकल्यावर काही भक्त अंगावर आले. स्वाभाविक आहे. त्यांच्या पुढाऱ्यांचं हे नवं लग्न लागलं आहे.माझा काय संबंध हा त्यांचा प्रश्न होता. त्यांच्यासाठी ही माहिती-
मी क्रिकेटच नव्हे, खेळांचा चाहता आहे. माझा मुलगा मुंबई अंडर 17 साठी क्रिकेट खेळलाय. मी षटकारचा प्रकाशक होतो. संदीप संपादक, द्वारकानाथ संझगिरी आणि मकरंद वायंगणकर सहसंपादक. पुढे संजय कऱ्हाडे आणि सुनंदन लेले यांनी षटकार सांभाळला. अनेक क्रीडाविषक पुस्तकं मी प्रकाशित केली आहेत. त्याही पलिकडे, मी या देशाचा नागरिक आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या अनेक भानगडी रवी मांद्रेकर यांनी बाहेर काढल्या. वि. वि. करमरकर यांनी मटामध्ये आणि मकरंदने षटकारमधून त्या लावून धरल्या. पुढे महानगर आणि आयबीएनने ही प्रकरणं लावून धरली.
शरद पवार आणि आशीष शेलार यांच्याकडे उमदेपणा असता तर त्यांनी संदीप पाटीलला अध्यक्ष केलं असतं. पण त्यांना एकमेकांचे हितसंबंध जपायचेत.
संदीपने राजकारण्यांशी जी लढत दिली ती कौतुकास्पद आहे. फक्त २५ मतांनी त्याचा पराभव झाला. तरीही त्याने मोठ्या मनाने मुंबई क्रिकेटसाठी काम करायची तयारी दाखवलीय.
माझं या संधीसाधू पुढाऱ्यांना एकच सांगणं आहे- किती ओरबाडाल? पदं, पैसा, प्रतिष्ठा…लाज वाटते तुमची!