एखादी दरोडा पडावा असा आत्मघाती निर्णय घेऊन रात्री ८ वाजता टीव्हीवर ५ मिनिटात नोटाबंदीचा आत्मघाती निर्णय घेऊन देशाला वेठीस धरण्याचे काम,काम कसले तर एकप्रकारे पाप केंद्रातील भाजप सरकारने केले होते.
या निर्णयातून साध्य काहीही झाले नसले तरी मात्र अनेक सामान्य नागरिकांना रांगेत उभं राहून मृत्यू ओढवून घ्यावा लागला होता हे आपणास ठाऊकच आहे.
याचा परिणाम नाही मिळाला तर मला जाहीर फाशी द्या अशी घोषणा नरेंद्र मोदी या पंतप्रधानांनी केली होती.या चुकीच्या निर्णयामुळे देशातील अनेक छोटे मोठे उद्योग बंद पडले,बेरोजगारी वाढायला लागली,आर्थिक व्यवस्था मंदावली पण काळा पैसा काही सापडला नाही.नदीत मगरीचे पिल्लू सापडले आणि ते मी घरी घेऊन आलो होतो अशीच एक कहाणी बनवत पंतप्रधान नोटाबंदी मिरवत राहिले.
अनेकांची लग्न,दशक्रिया विधी,यासह सार्वजनिक आणि वैयक्तिक कारणासाठी देखील त्यावेळी या सरकारने बँकेतून पैसे काढू दिले नाही मात्र भाजपच्या नेत्यांच्या कार्यक्रमांना पैसा उपलब्ध होत राहिला.
असा विचारहीन निर्णयाची अर्थशास्त्रज्ञ यांनी चिरफाड केल्यावर मोदी सरकार ताळ्यावर आले.मी म्हणेल तेच खरे अशी प्रवृत्ती असलेला मानून या देशाला परवडणारा नाही ही आता नागरिकांची खात्री झाली आहे त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक सहभागी होत आहे.