Petrol Diesel Price Today : देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर…
Petrol Diesel Price Today 22 November 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तरिही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) मात्र स्थिर आहेत. आज सकाळी भारतील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. नव्या दरांनुसार आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज सकाळी जारी करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार, देशात सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जात आहे. तर सर्वात पेट्रोल-डिझेल स्वस्त पोर्ट ब्लेयरमध्ये विकलं जात आहे. पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोल 84.10 लिटर रुपये, डिझेल 79.74 लिटर रुपयांनी विकलं जातंय.
90 डॉलर्सच्या खाली कच्चं तेल, 182 व्या दिवशी इंधनाचे दर स्थिर :
कच्च्या तेलाचे दर 90 डॉलरच्या खाली घसरले होते. काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती खाली आल्या आहेत. सध्या, WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 90 डॉलर आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 95 डॉलरच्या जवळ पोहोचलं आहे.
देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या दरांत कोणताही मोठा बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत यापूर्वी 22 मे रोजी देशातील चार महानगरांमध्ये झाला होता. जवळपास सहा महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, 22 मे 2022 रोजी सरकारनं उत्पादन शुल्क कमी केलं होतं, त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं.
यानंतर अनेक राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटही कमी केला. महाराष्ट्रात तेलावरील व्हॅटमध्ये कपात केल्यानं किमतीत घसरण झाली होती. तेल कंपन्या रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्यानंतर कंपन्यांकडून नवीन दर जारी केले जातात. सरकारी तेल कंपनी IOCL नं आजचे नवीन दर जारी केले आहेत.
देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
- दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर