दिल्ली, 30 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा एपिसोड आज प्रसारीत होणार आहे. हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी सरकारकडून मोठी तयारीही करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रतिनिधींनी सांगितलं की, या एपिसोडचे संयुक्त राष्ट्र मुख्यालयातही थेट प्रसारण होईल. केंद्र सरकारने याबाबत एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून पंतप्रधानांचा हा रेडिओ शो कसा रेकॉर्ड केला जातो ते दाखवण्यात आलं आहे. व्हिडीओत रेकॉर्डिंग स्टुजिओमध्ये जाण्याआधी पंतप्रधान मोदी रेडिओतील लोकांसोबत बोलताना दिसतात. त्यानंतर मोदी श्रोत्यांशी संवाद साधतात.
मन की बातचा शंभरावा एपिसोड अविस्मरणीय आणि ऐतिहासिक करण्यासाठी भाजपकडूनही मोठी तयारी केली जात आहे. पक्षाने हा कार्यक्रम तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्थाही केली आहे. कार्यक्रमाचे थेट प्रसारण दूरदर्शनवरून देशभरात होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ने केली कमाल; 100 कोटी नागरिकांनी…
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करतात. विजयादशमीच्या मुहूर्तावर 3 ऑक्टोबर 2014 रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. याआधीचा एपिसोड २६ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता. मन की बात हा कार्यक्रम दर महिन्याच्या रविवारी ऑल इंडिया रेडिओवरून प्रसारीत होणारा कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. ज्याचं प्रसारण डीडी नेटवर्कवरही केलं जातं. फक्त 30 मिनिटांचा हा कार्यक्रम. आज 30 एप्रिल रोजी याचे 100 एपिसोड पूर्ण होणार आहे. त्याआधी पीएम मोदींच्या या मन की बातचा देशावर नक्की काय परिणाम झाला, याचा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.
15 मार्चपासून विशेष मोहिम
भारतात होत असलेल्या बदलांवर या कार्यक्रमाचे परिणाम यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ऑल इंडिया रेडिओने १५ मार्चपासून शंभराव्या एपिसोडआधी एक मोहिम सुरू केली आहे.मन की बातच्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी हायलाइट केलेल्या १०० विषयांना पुढे आणले जाईल. मन की बातच्या प्रत्येक एपिसोडशी संबंधीत मोदींच्या साउंड्स बाइट सर्व बुलेटिन आणि आकाशवाणी नेटवर्कच्या कार्यक्रमात प्रसारित केल्या गेल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.