नरेंद्र मोदींनी जगभरात प्रभावशाली नेते म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे.
New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जगभरात लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळख आहे. आपल्या यशस्वी राजकीय कारकिर्दीमुळे त्यांना जगभरातील प्रभावशाली नेत्यांमध्ये गणले जात आहे. त्यामुळे मोदींचे नावाची चर्चा आता चक्क शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी (Nobel Award) होत आहे. नोबेल पुरस्कार समितीच्या सदस्याने पंतप्रधान मोदींचे कौतूक केले आहे. त्यामुळे आगामी काळात कदाचित भारतीयांना नोबेल पुरस्काराशी संबंधित मोठी बातमी ऐकायला मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
नोबेल पारितोषिक समितीची टीम नॉर्वेहून भारतात आली आहे. हीच समिती शांतता पुरस्कार विजेत्याचा (Nobel Peace Award) निर्णय घेते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या समितीच्या उपनेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia-Ukraine War) थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल कौतुक केले आहे.
नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची (Nobel Peace Award) घोषणा करण्यासाठी भारतात आलेल्या नॉर्वेच्या नोबेल पारितोषिक समितीचे उपनेते अस्ले तोजे यांनी एका माध्यमाला सांगितले की, “आम्हाला नोबेल शांतता पुरस्कारासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय नामांकन मिळत आहेत. मला आशा आहे की जगातील प्रत्येक नेता नोबेल शांतता पुरस्कारासाठी आवश्यक असलेले काम करेल.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा उल्लेख करत तोजे म्हणाले, “मोदींसारख्या ताकदवान नेत्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबरदस्त क्षमता आहे. पीएम मोदी हे अतिशय शक्तिशाली देशातून आले आहेत, त्यांना खूप गांभीर्याने घेतले जाते. त्याच्यामध्ये अफाट विश्वासार्हता आहे. पंतप्रधान मोदी रशिया, अमेरिका आणि चीनच्या प्रमुखांशी युद्धाबाबत बोलले आहेत. त्यांनी आगामी भविष्य युद्धाचे नाही तर शांततेचे असावे, असे सांगितेल आहे. मला आनंद आहे की मोदी केवळ भारताला पुढे नेण्याचे काम करत नाहीत तर जगातील शांततेसाठी काम करत आहेत.”