बंजारा समाजातील समस्त समाज बांधवांना कळविण्यात येते की बंजारा समाजाचे धर्मगुरू व महंत यांच्या मार्गदर्शनात दिनांक 14 ऑगस्ट 2022 ला रविवारी सकाळी 11:00 वा. बंजारा धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या धर्म परिषदेत बंजारा समाजाच्या शैक्षणिक सामाजिक व राजकीय वाटचालींसोबत समाजाच्या समस्यांवर चर्चा करणे आणि ठोस निर्णय घेण्याचे ठरवण्यात येणार आहे.
तरी सर्व बंजारा तांड्यातील नायक कारभारी डाव आणि प्रतिष्ठित नागरिकांनी या परिषदेला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन पोहरागड बंजारा काशीचे धर्मगुरू आणि सर्व महंतांनी केले आहे..