पुणे, 15 मे : खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या ९ मुली पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली आहे. या 9 मुलींपैकी 7 जणींना वाचवण्यात यश आलं असून दोघी अद्याप बेपत्ता आहेत. स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचवता आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोऱ्हे-खुर्द गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली.दोन पैकी एक मुलगी पाण्या बाहेर काढण्यात आली आहे. तर त्याआधी स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचविण्यात यश आलं. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
मध्यरात्री अल्पवयीन मुलीसोबत रस्त्यावर धक्कादायक घटना, अमरावतीत खळबळ
तुमच्या शहरातून (पुणे)
कलमाडी फार्म हाऊस जवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी उतरल्या होत्या. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या. तेव्हा दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली.
लिफ्टमध्ये मान अडकून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, गळा कापला अन् पडला रक्ताच्या थारोळ्यात
छत्रपती संभाजीनगरमध्ये लिफ्टचा दरवाजा अचानक बंद होऊन घडलेल्या दुर्घटनेत १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलाचा गळा अडकल्याने तो कापला गेल्याचा प्रकार घडला आहे. साकीब सिद्दिकी इरफान सिद्दिकी असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, साकीबचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे त्याला आजी आजोबांकडे ठेवण्यात आले होते. कटकट गेट भागात असणाऱ्या हयात हॉस्पिटलजवळच्या इमारतीत त्याचे आजी आजोबा राहतात. रविवारी रात्री साकीब तिसऱ्या मजल्यावर खेळत होता. त्यावेळी तो लिफ्टमध्ये गेला अन् लिफ्ट सुरू केली. तेव्हा दरवाजा बंद होत असताना बाहेर पाहताना त्याचा गळा दरवाजात अडकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.