चंद्रपूर शहर व ग्रामीण काँग्रेस, महिला काँग्रेस, युथ काँग्रेस तर्फे पूरग्रस्तांना अन्न धान्य सामग्री व ब्लँकेट चे वाटप.
चंद्रपूर शहर व ग्रामीण काँग्रेस, महिला काँग्रेस, युथ काँग्रेस तर्फे जिल्ह्यातील रहमतनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना अन्न धान्य सामग्री व ब्लँकेट चे वाटप आज करण्यात आले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
एका आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. ज्यामुळे घरातील अन्न धान्य , कपडे यांसह दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तूंचे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना आधार मिळवा या हेतूने काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन हा मदतीचा हात पुढे केला याचा आनंद आहे.
फक्त राजकारण न करता माणुसकीचा धर्म पाळून समाजातील गरजूंना सदैव मदत करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असते. जनहिताचे उपक्रम पुढे सुद्धा अशीच सुरू राहतील हा विश्वास चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना मी देतो.