राजौरी, 05 मे : जम्मू-कश्मीरमधील राजौरीमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली आहे. या कारवाईमध्ये भारतीय सैनाचे 5 जवान शहीद झाले आहे. यामध्ये काही जवान जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर अजूनही सैन्याचं ऑपरेशन सुरू आहे. खबरदारी म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजौरी येथील कंडी परिसरात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली. दहशतवाद्यांनी अचानक जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. यावेळी 5 जवान शहीद झाले आहे. तर 4 जवान जखमी झाले आहे. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. जखमी जवानांना उधमपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
#WATCH जम्मू-कश्मीर: राजौरी के कंडी जंगल में सुरक्षा बलों और आतंकवादियों के बीच मुठभेड़ अभी भी जारी है।
(वीडियो वर्तमान समय के अनुसार नहीं है।) pic.twitter.com/RTVMroLP2Y
— ANI_HindiNews (@AHindinews) May 5, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.