मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ही देशातली सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. आर्थिक घडामोडी आणि निर्णयांशी संबंधित माहिती योग्य प्रकारे देशातल्या नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी आरबीआयला सक्षम अधिकाऱ्यांची गरज असते.
या कामासाठी आरबीआयने कराराच्या आधारावर कम्युनिकेशन कन्सल्टंट किंवा मीडिया विश्लेषक पदासाठी पात्र भारतीय उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. आरबीआय भरती 2023 च्या अधिसूचनेनुसार, या पदासाठी एक जागा रिक्त आहे. एक वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडलेल्या उमेदवाराची नियुक्ती केली जाईल.
आरबीआय भरती 2023च्या अधिसूचनेनुसार, कम्युनिकेशन कन्सल्टंट किंवा मीडिया विश्लेषक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 35 ते 50 वर्षांच्या दरम्यान असलं पाहिजे. नियुक्ती मिळालेल्या उमेदवाराला 58.32 ते 67.44 लाख रुपये वार्षिक वेतन मिळेल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी योग्यरीत्या भरलेले अर्ज खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावेत. इतर कोणत्याही स्वरूपात पाठवलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. 21 मे 2023 रोजी किंवा त्यापूर्वी भरलेला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. अपूर्ण किंवा शेवटच्या तारखेनंतर मिळालेले अर्ज सरसकट नाकारले जातील. संपूर्ण माहितीसाठी कृपया आरबीआयचे अधिकृत नोटिफिकेशन वाचावे.
पोस्टचं नाव आणि संख्या : आरबीआय भरती 2023च्या अधिसूचनेनुसार, कराराच्या आधारावर कम्युनिकेशन कन्सल्टंट किंवा मीडिया विश्लेषक पदासाठी पात्र भारतीय उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी फक्त एक जागा रिक्त आहे.
पात्रता : इच्छुक उमेदवारांनी नामांकित विद्यापीठाशी संलग्न किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून मास कम्युनिकेशन/ पत्रकारिता / जनसंपर्क विषयांमध्ये प्रथम श्रेणीसह (कमीत कमी 60 टक्के) ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं पाहिजे.
किंवा
इच्छुक उमेदवारांनी नामांकित विद्यापीठाशी संलग्न किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून इकॉनॉमिक्स किंवा लिटरेचर विषयांमध्ये प्रथम श्रेणीसह (कमीत कमी 60 टक्के) ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं पाहिजे. यासोबत कमीत कमी एका वर्षाचा मास कम्युनिकेशन/ पत्रकारिता / जनसंपर्क विषयांमध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला असला पाहिजे.
अनुभव : आरबीआय कम्युनिकेशन कन्सल्टंट किंवा मीडिया विश्लेषक पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना पत्रकारिता किंवा मीडियामध्ये काम करण्याचा किमान 10 वर्षांचा अनुभव असावा. इकॉनॉमिक किंवा फायनान्शिअल बीटचा अनुभव असल्यास जास्त प्राधान्य दिलं जाईल. किंवा उमेदवाराला बँका, वित्तीय संस्था आणि फायनान्शिअल सेक्टर रेग्युलेटर म्हणून पब्लिक रिलेशन क्षेत्रामध्ये काम करण्याचा किमान 10 वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा : आरबीआय भरती 2023 च्या अधिसूचनेनुसार, कम्युनिकेशन कन्सल्टंट किंवा मीडिया विश्लेषक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 35 ते 50 वर्षांच्या दरम्यान असलं पाहिजे.
कार्यकाळ : आरबीआय कम्युनिकेशन कन्सल्टंट किंवा मीडिया विश्लेषक पदावर नियुक्ती मिळालेल्या व्यक्तीला एका वर्षाच्या काळासाठी सेवेत घेतलं जाईल.
वेतन : आरबीआय कम्युनिकेशन कन्सल्टंट किंवा मीडिया विश्लेषक पदावर नियुक्ती मिळालेल्या व्यक्तीला 58.32 ते 67.44 लाख रुपये वार्षिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : आरबीआय भरती 2023 च्या अधिसूचनेनुसार, एक स्क्रीनिंग कमिटी प्राथमिक स्क्रिनिंग/शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीद्वारे योग्य उमेदवाराची निवड करील.
अर्ज कसा करावा : इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी योग्यरित्या भरलेले अर्ज खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावेत. इतर कोणत्याही स्वरूपात पाठवलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, तिसरा मजला, आरबीआय बिल्डिंग समोर, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, भायखळा, मुंबई – 400008
भरलेला अर्ज 21 मे 2023 रोजी किंवा त्यापूर्वी दिलेल्या पत्त्यावर पोहचला पाहिजे. अपूर्ण किंवा शेवटच्या तारखेनंतर मिळालेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.