मोहाली, 21 एप्रिल : पंबाज विरुद्ध आरसीबी यांच्यातील सामन्यात आरसीबीने २४ धावांनी विजय मिळवला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १७४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जचा संघ १५० धावांपर्यंतच मजल मारू शकला. मोहम्मद सिराजने २१ धावात ४ तर वानिंदू हसरंगाने दोन गडी बाद केले. आरसीबीच्या फाफ ड्युप्लेसिसने जबरदस्त फलंदाजी केली. त्याचं शतक थोडक्यात हुकलं.
पंजाबविरुद्ध विराट आणि फाफ डुप्लेसिस यांनी ९८ चेंडूत १३७ धावांची भागिदारी केली. मात्र इतर फलंदाजांना धावा करता न आल्यानं आरसीबीला २० षटकात ४ बाद १७४ धावाच उभारता आल्या. तर १७५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबचा संघ १५० धावात तंबूत परतला. आरसीबीने हा सामना २४ धावांनी जिंकला.
IPL Top Moments: नो बॉलने KKRचा केला घात, रसेलच्या मसल पॉवरवर वॉर्नरची खेळी पडली भारी
सध्या आरसीबी पॉइंट टेबलममध्ये पाचव्या स्थानी आहे. सहा पैकी तीन सामन्यात त्यांचा विजय झाला आहे. चेन्नई, गुजरात, मुंबई आणि कोलकाता आणि आरसीबी यांचे गुण समान आहेत. मात्र चेन्नईने धावगतीच्या जोरावर तिसरे तर गुजरातने चौथे स्थान पटकावले. गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स टॉपला आहे तर लखनऊन दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघानी सहा पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे.
यंदाच्या हंगामात सध्या ऑरेंज आणि पर्पल कॅप दोन्हीही आरसीबीच्या खेळाडूंकडे आहेत. मात्र गुणतालिकेत आरसीबी पाचव्या स्थानी आहे. यावर बोलताना कर्णधार विराट कोहली म्हणाला की, ‘पॉइंट टेबलमध्ये कोणत्या स्थानी यावरून संघ कसा हे ठरत नाही.’ ऑरेंज कॅपच्या शर्यतीत फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांच्यात शर्यत लागलीय. फाफच्या ३४३ तर विराटच्या २७९ धावा झाल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत मोहम्मद सिराज १२ विकेटसह आघाडीवर आहे. तर मार्क वूड, युझवेंद्र चहल, राशीद खान यांच्या प्रत्येकी ११ विकेट झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.