बंगळुरू, 11 एप्रिल : एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना अखेरच्या चेंडुपर्यंत रंगला. अखेरच्या षटकात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. लखनऊने शेवटच्या चेंडूवर एक गडी राखून सामन्यात विजय मिळवला. लखनऊला अखेरच्या दोन षटकात विजयासाठी १५ धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे ४ विकेट शिल्लक होत्या.
आरसीबीच्या वेन पार्नेलने १९ वे षटक टाकले. त्यात पहिले दोन चेंडू वाईड होते. त्यानतंर दोन चेंडूवर एक एक धाव निघाली तर तिसऱ्या चेंडूवर आय़ुष बदोनीने चौकार मारला. पुढच्या चेंडूवल षटकार मारला होता, पण त्याच वेळी बॅट स्टम्पला लागली आणि तो हिटविकेट बाद झाला. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूत दोन धावा निघाल्या. १९ व्या षटकात एकूण १० धावा लखनऊने काढल्या.
. . @LucknowIPL pull off a last-ball win!
A roller-coaster of emotions in Bengaluru
Follow the match ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/96XwaYaOqT
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.