दादरमध्ये अनंत चतुर्दशी दिवशी झालेल्या मारहाणीप्रकरणी सदा सरवणकर यांच्या चौकशीची शक्यता वर्तविली जात आहे. शिंदे आणि ठाकरे गटात ही मारामारी झाल्यानंतर हा वाद दादर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. सदा सरवणकर यांना त्यांच्या मुलासह चौकशीसाठी बोलावण्यासाठी काल पोलिसांनी समन्स पाठवले होते. त्या पार्श्वभूमीवर आज त्यांना पोलीस तपासाचा भाग म्हणून चौकशीसाठी बोलवणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पोलिसांनी सदा सरवणकर यांची बंदूक जप्त केली. ठाकरे गट यांच्यातील वाद आता दादर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. पहिला गुन्हा ठाकरे गटातील शिवसैनिकांवर दाखल झाला आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, कलम 395 हटवल्याने कोर्टाने त्यांना जामीनावर मुक्त केले.दरम्यान, शिवसेनेचे वरिष्ठ नेते आक्रमक झाल्यानंतर दादर पोलिसांनी गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकर यांच्यासह सहा जणांना विरोधात गुन्हा दाखल केला. आता पोलिसांनी सदा सरवणकर यांची बंदूक जप्त केली.
पोलिसांनी समन्स बजावले – शिंदे गटातील बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी ज्या बंदूकिने गोळीबार केला, ती बंदूक पोलिसांनी तपास होईपर्यंत जप्त केली आहे. जप्त केलेल्या बंदूकीची तपासणी होणार असून आमदार सरवणकर आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांना पोलिसांनी समन्स बजावले.