विधानपरिषद निवडणुकीत आता कमालीची चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी सहाव्या जागेसाठी भाजप समर्थित उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्या नावाची घोषणा सहावे उमेदवार म्हणून केली आहे. विधान परिषदेसाठी आता 10 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात आहेत. यात महाविकास आघाडीकडून सहा तर भाजपकडून सहा उमेदवार आता रणांगणात आहेत.
महाविकास आघाडीचे सहा (शिवसेना 2, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी 2) भाजपचे सहा उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गर्जे तिसरा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून मुंबईकर भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे मैदानात आहेत.
विधान परिषदेच्या आखाड्यात असलेले उमेदवार
शिवसेना
सचिन अहिर
आमश्या पाडवी
काँग्रेस
भाई जगताप
चंद्रकांत हंडोरे
भाजप
प्रवीण दरेकर
उमा खापरे
श्रीकांत भारतीय
राम शिंदे
प्रसाद लाड
सदाभाऊ खोत
राष्ट्रवादी
एकनाथ खडसे
रामराजे नाईक निंबाळकर