राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर प्रथमच संजय राठोड हे बंजारा समाजाचे शक्तिस्थान असलेल्या संत श्री सेवालाल महाराज,पोहरादेवीगड येथे दर्शन घेण्यासाठी रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता येणार असून त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
माता जगदंबा,संत श्री सेवालाल महाराज,श्री संत बाबनलाल महाराज,परमपूज्य डॉ.रामराव बापू यांच्या तसेच समाजाच्या आणि मतदारसंघातील सर्व नागरीकांच्या कृपा आशीर्वादाने आणि राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने बहुजन नेते संजय राठोड यांना मंत्रिपद देऊन बंजारा समाजाला न्याय दिल्याची भावना आहे.
नामदार संजय राठोड यांच्या आगमनानिमित्त महापूजा,भोग भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी बंजारा समाजातील बंधू भगिनिसह जेष्ठ – श्रेष्ठ व नव तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.