काळया शेतकरी कायद्याविरोधात आपल्या मागण्यांसाठी दिल्ली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात अनेक शेतकरी शहीद झाले.एवढेच काय तर भाजपच्या शेतकरी पुत्राने आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घालत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी मागे हटले नाही.
विविध मार्गाचा अवलंब करत आंदोलन भटकवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असलेला अन्नदाता या हुकुमशाही भाजपा सरकारपुढे झुकला नाही.मग केंद्र सरकारच लोटांगण घालत हे कायदे मागे घेण्यासाठी सरसावले मात्र या काळात शहीद झालेल्या शेतकऱ्यांचे काय.
मूलभूत मागण्यांसाठी लढणे हा अधिकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तर त्या अहिंसक मार्गाने मान्य करून घेणे हे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितले आहे.याच धर्तीवर हे आंदोलन उभे राहिले होते.
मात्र केंद्र सरकारने या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न करून शेकडो शेतकऱ्यांना शहीद व्हावं लागलं याच प्रायश्चीत न करता त्यांना मदत केली नाही.त्यामुळे या शेतकऱ्याचा मनात देखील मोठा संताप आहे.