मुंबई, 02 मे : ‘आपल्या…आतापर्यंत महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नावाने मत मागतो, पक्षाला मतं शरद पवार साहेबांच्या नावाने मिळतात. आज पवार साहेबच बाजूला गेले तर कुणाच्या नावाने मत मागायचं आहे’ असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रडू फुटले.
‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे नेते आणि कार्यकर्ते हादरून गेले. सगळेच नेते रडायला लागले. जयंत पाटील यांना उभंही राहता आलं नाही.
लग्न मंडपापासून ते निवृत्तीच्या घोषणेपर्यंत, पत्नीने दिली शरद पवारांची साथ
तुमच्या शहरातून (मुंबई)
‘पवार साहेबांनी प्रमुख पद राहायचं, देशातील जनतेसाठी आणि वेगवेगळ्या राज्यासाठी गरजेचं आहे. अशा अचानक पवार साहेबांनी बाजूला जाणं हे बरोबर नाही. त्यांनी परस्पर असा निर्णय घेण्याचा अजिबात अधिकार नाही, असा निर्णय घेणे देशातील कुठल्याही माणसाला हे पटणार नाही. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती करतो, असं म्हणत जयंत पाटील यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
पवार साहेबांनी काही दिवसांपूर्वी भाकरी बदलण्याची भाषा केली होती. त्यांना नेतृत्वात बदल करायचा असल्यास त्यांनी खुशाल करावा, आम्ही सगळे राजीनामा द्यायला तयार आहे. त्यांनी नव्या नेतृत्वाला संधी द्यावी. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आम्हाला सवय झाली आहे, त्यांची गरज फक्त पक्षाला नाही तर देशातील अनेक घटक, तरुण, युवा कार्यकर्त्यांना आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.