मुंबई, 05 मे : शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले हुकमी एक्का असल्याचं स्पष्ट झालंय. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवड समितीनं शरद पवारांचा राजीनामा फेटाळला आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंत केली आहे. त्यानंतर पवार यांनीही विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. मागीच 4 दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बैठकांचं सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एका मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
‘आज राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील नेत्यांसोबत चर्चा झाली. शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये राजीनामा देण्याची घोषणा केली. पण, यावर अनेक मान्यवरांनी आपला भावना व्यक्त केली. त्याबद्दल आम्ही प्रस्ताव मांडला. आम्ही सगळ्यांनी त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली आहे’ असं पटेल यांनी सांगितलं.
‘शरद पवार यांना आम्ही राजीनामा मागे घेण्यास विनंती केली आहे. ते आमचे नेते आहे, लगेच ते उत्तर देणार नाही. त्यांनी आणखी वेळ मागितला आहे. आम्हाला काही निरोप मिळाला, तर त्याबद्दल माहिती देऊ, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
दरम्यान, आजच्या बैठकीत अध्यक्ष शरद पवारांचा राजीनामा समितीनं एकमतान फेटाळून लावला. शरद पवारांचा राजीनामा हा आमच्यासाठी धक्का होता त्यांची पक्षाला गरज असून त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती समितीमधील नेत्यांनी केली. शरद पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावं,, अशी विनंती या समितीनं केली. आता समितीमध्ये केलेला हा ठराव शरद पवारांना पाठवण्यात येणार आहे. यानंतर शरद पवार या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आता शरद पवार समिती आणि कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन राजीनामा मागे घेतात का की आपल्या राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम राहतात हे पाहाणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.
निवड समितीचा ठराव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता.आदरणीय पवारसाहेबांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.