केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे काळे कायदे आणले होते हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे.ते कोणासाठी हे देखील आता लपून राहिले नाही.प्रचंड विरोधानंतर ते मागे घेण्यात आले.ती सल या सरकारच्या मनात असल्यामुळेच शेतकऱ्यांना आतापर्यंत त्याची किंमत चुकवावी लागत आहे.
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अशी घोषणा केली.हमीभाव देऊ, सर्वोतोपरी मदत करू असे एक ना अनेक जुमले दिले गेले मात्र भाजपा सरकारने शेतकऱ्यांची केवळ छळवणूकच केली.
आपआपल्या परीने शेतकरी तसेच शेतकरी संघटना यांनी आंदोलने केली, परंतु पोलिस बळाचा वापर करून ती दडपण्याचा प्रयत्न केला गेला.त्यामुळे प्रचंड रोष शेतकऱ्यांमध्ये असून त्याला या यात्रेच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली जाईल.