मुंबई, ता. १० सप्टेंबर २०२२ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा आणि छोटे व्यावसायिक आणि दुकानदार यांचा जवळचा संबंध आहे.गब्बर सिंग टॅक्स आणि यासंदर्भातील घेतलेले चुकीचे निर्णय यामुळे हा घटक भरडला गेला आहे.
राहुल गांधी यांनी देखील त्यांच्या भाषणातून अनेक वेळा छोटे व्यावसायिक आणि दुकानदार यांचा प्रश्न आणि समस्या मांडल्या होत्या,मात्र केंद्र सरकारने त्यासाठी आवश्यक ती पावले उचलवी नाही.परिणामी या घटकाला मोठी किंमत चुकवावी लागली.
देशभर चालणाऱ्या या यात्रेत मोठ्या प्रमाणावर छोटे व्यावसायिक आणि दुकानदार राहुल गांधी यांच्या या यात्रेत सहभागी झाले तर नवल वाटायला नको.