शिवानी वडेट्टीवार : महिला दिनानिमित्त मेंडकी येथे कष्टकरी महिलांच्या सत्कार सोहळ्यात केले मार्गदर्शन
Bramhapuri : शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी (School-College Students) तसेच महिला कर्मचारी (Workers) यांना मासिक पाळीदरम्यान हक्काची पगारी सुट्टी (Menstrual Leave) मिळावी, म्हणून संघर्ष करावा लागत आहे. सरकारला याचे गांभीर्य कळत नाही कारण राज्य सरकारमध्ये (State Government) महिला व बालविकास खात्याला महिला मंत्रीच नाही. त्यामुळे विधानसभा (Vidhansabha) आणि लोकसभेत (Loksabha) महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे आरक्षण (Reservation) मिळाल्यास महिलांचा सहभाग वाढेल आणि त्यांचे प्रश्न अधिक गतीने मार्गी लागण्यास मदत होईल, शिवाय केवळ महिलांचेच नव्हे तर देशाच्या विकासासाठी देखील आरक्षण मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या (Maharashtra Youth Congress) सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) गुरुवारी तालुक्यातील मेंडकी येथे आयोजित कष्टकरी महिलांच्या (Hardworking Women) सत्कार सोहळ्याला शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी उपस्थित राहत महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, ज्या महिलांनी आतापर्यंत उत्तमपणे घर ते देश सांभाळला अशा प्रतिनिधीची संख्या वाढली तर नक्कीच वेगळे चित्र पाहायला मिळू शकते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) याचे उत्तम उदाहरण आहे.
दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान केला जातो, मात्र ते करत असताना ग्रामीण भागात (Rural) कठोर परिश्रम करणाऱ्या कर्तृत्ववान कष्टकरी महिला (Hardworking Women) दुर्लक्षित राहू नये, या उद्देशाने ब्रम्हपुरी (Bramhapuri) तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मंगला लोनबले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याबद्दल शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी कौतुक करताना म्हणाल्या, त्यांनी आपला इथपर्यंतचा प्रवास घडविण्यासाठी अंगावर दगड, शेण झेलनाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले (Savitribai Phule), क्रांतिसूर्य महात्मा फुले (Mahatma Phule) यांचे आभार मानले पाहिजे. आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा असून मुलींना शिक्षण द्या, परिस्थितीशी लढण्याचे बळ द्या.