खरंतर लहानपणापासून आपण सर्वच बघत आलोय की केवळ निवडणुका आल्या की आरोप – प्रत्यारोप व्हायचे आणि इतर वेळी सर्वच विरोधक आणि सत्ताधारी मिळून जनतेच्या भल्यासाठी काम करत असायचे.
विरोधक आणि सत्ताधारी मेळ साधत राज्याचा विकास कसा साधता येईल,नवनवीन कोणत्या योजना राबविता येईल.युवक,शेतकरी,महीला यासह एकूणच सर्व घटकांचा विकास साधण्यासाठी काम करायचे.
मात्र गेल्या काही दिवसापासून,वर्षापासून आपण पाहतो मग केंद्रातील भाजपा सरकार असो की त्यांच्याच राजवटीत राज्यातील भाजपा सरकार असो. हे लोक केवळ आणि केवळ भंपक आरोप आणि अनावश्यक गोष्टींवर चर्चा, वाद घालत आहे.विविध तपास यंत्रणांना हाताशी धरून बदनाम करत आहे.
राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन दोन महिने होऊन गेले मात्र यांनी लोकाभिमुख निर्णय घ्यायचे सोडून केवळ आरोप करण्यात वेळ वाया घालवत आहे.
त्यामुळे राज्यातील युवा वर्गाची प्रतिनिधी म्हणून मला वाटते की या सरकारने जनतेच्या समस्या,प्रश्नांना प्राथमिकता देऊन कामे करावे.