रखडलेली नोकरभरती,बेरोजगारी आणि महागाईमुळे अस्वस्थ झालेल्या तरुणांना राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री यांनी गांभीर्याने घेत मदत करायला हवी.
आज राज्यातील तरुण बेरोजगारीमुळे हताश झाला आहे.कार्यक्षमता असून देखील संधी नसल्याने निराश झालेल्या तरुणांसाठी रोजगार मिळेपर्यंत सरकारने मासिक किमान १० हजार रुपये महागाई भत्ता द्यावा आणि जे तरुण स्वतःचा उद्योग सुरू पाहत आहे अशा तरुणांना भांडवल उभारणीसाठी किमान २५ लाख रुपये बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे.
असे झाल्यास हताश,निराश झालेला तरुण उभा राहू शकेल,बहुसंख्येने असलेल्या या युवा वर्गासाठी मुख्यमंत्री यांनी योग्य निर्णय घ्यावा असे अपेक्षा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.