दि.८ सप्टेंबर, मुंबई : कोरोना काळात राहुल गांधी यांनी वेळोवेळी महत्त्वाच्या सूचना देऊन देखील केंद्रातील भाजप सरकारने त्या ऐकल्या नाही,काही ऐकल्या तर त्यावेळी खूप उशीर होऊन गेला होता.त्याचा परिणाम स्वरूप अनेकांना आपले स्वकीय गमावावे लागले.
त्यावेळी केंद्रातील भाजप सरकार केवळ दिवे आणि थाळी वाजवण्यात मश्गूल राहिल्याने परिस्थितीने रौद्ररूप धारण केले.एकतर आगाऊ सूचना करून देखील प्रभावी काम न केल्याने देशात ५० लाखापेक्षा अधिक लोक मृत पावले.
बेड, ऑक्सिजन कमतरता,रेमडीसिव्हर याची कमतरता,वेळेत न मिळणे यामुळे देखील अनेकांना जीव गमावावा लागला.संकटाचा आवाका लक्षात न आल्याने आर्थिक हानी तर झालीच त्याचबरोबर अनेकांना हे जग सोडून जावे लागले त्यातच केंद्र सरकारकडून मदत न मिळाल्याने लोकांमध्ये मोठा रोष आहे.