विधानपरिषदेसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या. त्यानंतर लगेच उमेदवारी अर्ज भरण्याची लगबगही सुरु झाली.
दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज हे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भरले. यावेळी विधानपरिषदेवर शिवसेनेकडून
सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना संधी देण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांनी गेल्या विधानसभेची निवडणूक वरळीतून लढल्याने सचिन अहिर यांची अडचण झाली होती. त्यामुळे आता त्यांना संधी मिळताच त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. तर भाजपच्या उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे.