लखनऊ, 30 एप्रिल : मीठ जेवणाला चव देतं पण हेच मीठ थोडं जरी जास्त झालं तर जेवणाची चवच बिघडते. खारट पदार्थ खायला कुणालाच आवडत नाही. मीठ जास्त खाण्याचे आरोग्यावरही गंभीर दुष्परिणाम होतात. पण एक तरुण ज्याच्या जेवणात थोडंसं मीठ जास्त झालं आणि त्याचा मृत्यूच झाला आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील ही धक्कादायक घटना.
पूरन शंकर दुबे असं या तरुणाचं नाव असल्याचं सांगितलं जातं आहे. 22 वर्षांचा पूरन त्याला मूळव्याधीचा त्रास होता. त्यामुळे तो खारट आणि तिखट पदार्थ खात नव्हता. शनिवारी रात्री तो दारू पिऊन घरी आला. नशेत तो जेवला. तेव्हा जेवणात त्याला मीठ जास्त असल्याचं समजलं. जेवण चाखल्यानंतर ते खारट लागताच तो भडकला. त्याला इतका राग आला की त्याने गोंधळ घातल
त्याचे वडील उमा शंकर म्हणाले की, तो रागात आपल्या खोलीत गेला. त्यानंतर आम्हाला गोळी झाडल्याचा आवाज आला. आम्ही त्याच्या खोलीत गेलो तेव्हा पूरन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या छातीवर गोळी लागल्याची जखम होती. त्याला केजीएमयूच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Shocking! गुळाची ढेप फोडताच मोठा ब्लास्ट, महिलेची भयंकर अवस्था; सत्य समजताच सर्वच हादरले
पोलिसांनी सांगितलं की, जेवणातील मिठावरून गोंधळ घालणाऱ्या तरुणाला त्याच्या कुटुंबाने दटावलं. पण त्यानंतर तो आपल्या खोलीत गेला आणि त्याने स्वतःवर गोळी झाडली.
इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार एसएचओ राज कुमार म्हणाले. कुटुंबातील कुणावरही आरोप नाही आहे. पूरनकडे बंदूक कुठून आली याचा तपास सुरू आहे.
या तरुणाने जेवणात मीठ जास्त झालं म्हणून आपलं आयुष्य संपवलं. पण खरंतर मिठाचं जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारच आहे. शरीराला आयोडिनची गरज असते जे आपल्याला मिठातून मिळतं. मात्र प्रमाणापेक्षा जास्त मीठ शरीरात गेल्यास त्याचे दुष्परिणामही होतात. खरंतर आपल्याला दररोज 5 ग्रॅम मिठाचीच गरज असते, आपण मात्र 10 ग्रॅमपेक्षाही जास्त मिठाचं सेवन करतो. माय उपचारशी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्ता शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार मिठाचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने हार्ट अटॅक, स्ट्रोकसारखी समस्या बळावळण्याची शक्यता असते.
अधिक मीठ खाण्याचे दुष्परिणाम
मेंदूमधील रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास स्ट्रोक होतो. वाढत्या वयानुसार स्ट्रोकचा धोका वाढतो असं नाही तर आहारावरदेखील हे अवलंबून आहे. आपण काय खातो त्याचा परिणाम शरीरावर हळूहळू होत असतो आणि वय वाढल्यानंतर हा परिणाम दिसून येतो. त्यामुळे जास्त मीठ खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका वाढतो.
कोरोनरी हार्ट डिसीजची शक्यता वाढते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये प्लाक जमा होऊन नसा आकुंचित पावतात आणि हृदयाला कमी रक्तपुरवठा होतो. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. मिठाच्या अतिसेवनामुळे ही समस्या बळावू शकते. शरीरात मीठ जास्त झाल्यास त्याचा ब्लड प्रेशरवरही परिणाम होतो आणि हृदयावर परिणाम होण्याचा धोका वाढतो.
बस्सं फक्त बर्गरचं नाव सांगा आणि मिळवा 2 लाख रुपये; एका झटक्यात लखपती होण्याची सुवर्णसंधी
जास्त मीठ खाल्ल्याने पोटाचा कॅन्सरही होऊ शकतो. मिठात हेलिकोबॅक्टर पिलोरी बॅक्टेरिया असतात जे पोटात सूजेला कारणीभूत ठरतात. जर या बॅक्टेरियांचं प्रमाण पोटात वाढलं तर पोटात अल्सर होतात. पोटाचा कॅन्सर होण्याचा धोकाही वाढतो.
शरीरात सोडियमचं अधिक प्रमाण हेच किडनी खराब होण्याचं कारण आहे. मीठ जास्त खाल्ल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो कारण मिठात सोडियम भरपूर असतं.
ऑस्टियोपोरोसिसमध्ये हाडातील कॅल्शिअमचं प्रमाण कमी होतं. शरीरात मीठ जास्त झाल्यास हाडांचं कॅल्शिअम कमी होतं आणि मिठाचं अधिक सेवन हाडं कमजोर बनवतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.