मुंबई, 07 मे : फिल्ममध्ये माणसाचा साप होताना तुम्ही पाहिलं असेल. प्रत्यक्षात हे शक्य नाही हे तुम्हालाही माहिती आहे. पण असंच एक धक्कादायक दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. एक तरुण पाहता पाहता अचानक साप बनला. तरुणाचं सापाचं रूप पाहून पोलीसही घाबरला. तो तिथंच आपली गाडी सोडून पळाला.
रस्त्यावर चालता चालता एक तरुण साप बनला. सापासारखं तो सरपटू लागला आणि तिथं असलेल्या पोलिसावर हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागला. हे संपूर्ण दृश्य कुणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे दृश्य पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.
VIDEO – खतरनाक किंग कोब्राला कारमधून खेचून तर काढलं पण…; पुढच्या क्षणी जे घडलं ते थरकाप उडवणारं
व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर बाईकवर बसलेला एक पोलीस दिसतो आहे. अचानक त्याच्या पायाजवळ एक तरुण येतो. जो सापासारखं सरपटताना, डोलताना दिसतो आहे. तो सापाच्या पायाजवळ जातो आणि सापाच्या पायाला चावा घेण्याचा प्रयत्न करतो. पोलीस त्याला पाहून घाबरतोच. तो त्याला लाथेनं बाजूला करतो आणि त्यानंतर लगेच आपल्या बाईकवरून उतरून त्या तरुणापासून दूर पळतो.
तरुण पुन्हा सरपटत त्या पोलिसाच्या मागे जातो. तिथंच पोलिसाची गाडीही आहे. जसा साप बनललेला तरुण पुन्हा त्याच्याजवळ येतो तसा तो त्या गाडीजवळ जातो आणि गाडीतून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतो.
तरुणाचं असं वागणं पाहून पोलीसही हैराण झाला आहे. या तरुणाला झालंय का, असा प्रश्न त्याला पडला आहे. तिथं असलेले लोकही त्या तरुणाला पाहून घाबरतात.
बापरे बाप! घरात घुसला असा दुर्मिळ साप, मालकाची हवा टाईट; PHOTO पाहूनच डोळे पांढरे होतील
funny_sandip या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.