Jalna : मंठा (Mantha) तालुक्यातील केहाळ वडगाव येथे सामाजिक कार्यकर्ते इंजि. माधव चव्हाण (Madhav Chavan) यांचा गुरुवारी सप्ताहनिमित्त भेटीदरम्यान उपस्थित नागरिकांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी माळेगाव येथे केलेले तीन दिवसीय भव्य सत्संगाचे आयोजन, गुरुवारी केहाळ वडगाव येथील सप्ताहास भेट, अशा धार्मिक सामाजिक कार्यक्रमात सहभागी असतात. चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक झाले पाहिजे या उद्देशांनी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामेश्वरगोरखनाथ राठोड, सेवकराम राठोड, पंढरीनाथ चव्हाण, गजानन चव्हाण, भगवान चव्हाण, करण राठोड, स्वप्नील राठोड, विजय राठोड यांच्यासह पंढरीनाथ दवणे, योगेश नाईक, दिपक दवणे, गणेश दवणे, शंकर नाईक दत्तराव, बाळासाहेब दवणे, अविनाश दवणे, गजानन नाईक, विजय दवणे, रामभाऊ दवणे, बाळासाहेब नाईक, अन्य मान्यवर व गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.