Rules in Suryagrahn Kaal : देशभरात सोमवारी दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात अंशतः दिसणार आहे. तत्पूर्वी, सुतक सुरू झाले असून, या काळात काही कामं करणं टाळणं फायदेशीर ठरू शकते.
आजचे हे सूर्यग्रहण 4 तास 3 मिनिटांचे असणार असून, दुपारी 02.29 हे ग्रहण लागणार आहे. जे संध्याकाळी 06.32 वाजता समाप्त होईल. भारतात संध्याकाळी 04:22 ग्रहणाला सुरूवात होणार आहे. सुतक हे सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी होते. सुतकादरम्यान काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ते महत्त्वाचे नियम काय आहेत ते जाणून घेऊया.
सुतक काळात करा या नियमांचे पालन
- सुतक काळात जेवण बनवले जात नाही आणि ते ग्रहणही केले जात नाही. हे नियम आजारी, वृद्ध आणि गर्भवती महिलांसाठी लागू नाहीत.
- सुतकापूर्वी जेवण तयार करण्यात आले असेल तर, त्यामध्ये तुळशीचे पान टाकावे. याशिवाय दूध, पाणी आदींमध्येही तुळशीचं पानं ठेवावं. यामुळे दूषित वातावरणाचा अन्नपदार्थांवर परिणाम होत नाही.
- गर्भवती महिलांनी सुतक काळात विशेष काळजी घ्यावी. सुतकपासून ग्रहण संपेपर्यंत गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये तसेच पोटावर गेरू लावून ठेवावे.
- सुतक काळापासून ग्रहणाचा काळ संपेपर्यंत गर्भवती महिलांनी कोणत्याही प्रकारची तीक्ष्ण वस्तू वापरू नये.
- सुतक काळात घरातील देवांची पूजा करू नये. त्याऐवजी मानसिक जप फलदायी ठरतो. त्यामुळे अधिकाधिक जप करण्यावर भर द्यावा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.