मराठी चित्रपट सृष्टीत तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनेता स्वप्नील जोशी याने स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. स्वप्नील जोशी सातत्याने चर्चेत असतो. सध्या तो चर्चेत आला आहे ते एका अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे. मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत गुणी आणि सालस अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेला ओळखलं जातं. मुक्ता प्रचंड बोलकी आणि अभ्यासू अभिनेत्री आहे. ती आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अगदी बिनधास्तपणे बोलत असते. अभिनेत्रीचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड पसंत पडतो. नुकतंच अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान आपल्या आयुष्यातील एका महत्वाच्या गोष्टीबाबत किस्सा शेअर केला आहे. नुकतंच अभिनेत्री मुक्ता बर्वे आपल्या ‘व्हाय’ या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. या चित्रपटाच्या टीजर आणि ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. अभिनेत्रीने या चित्रपटाचं जोरदार प्रमोशनदेखील केलं होतं.
दरम्यान, मुक्ताने राजश्री मराठीला एक मुलाखत दिली होती. यावेळी बोलताना अभिनेत्रीने आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यबाबत अगदी मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी अभिनेत्रीने अशी एक गोष्ट सांगितली जी ऐकून सर्वच चकित झाले. या मुलाखतीदरम्यान मुक्ताला विचारण्यात आलं होतं की, तुला कोणकोणते पदार्थ खायला आवडतात? किंवा तू लुक्स मेंटेन ठेवण्यासाठी डाएट करतेस का? यावर बोलताना मुक्ता म्हणाली,’मी डाएट वगैरे अजिबात करत नाही. कारण मी खूप फुडी आहे. मला सतत वेगवेगळे पदार्थ चाखायला आवडतात. मला बालपणापासूनच विविध खाद्यपदार्थांमध्ये रस आहे. परंतु ज्यावेळी मी काम करायला चालू केलं, त्यावेळी माझा या सगळ्याकडे दुर्लक्ष झाला.मला विविध पदार्थ त्याठिकाणी जाऊन आवडीने खाण्यासाठी वेळ मिळत नसे.परंतु माझी ही आवड स्वप्नील जोशीमुळे परत जागृत झाली. कारण आम्ही ज्यावेळी सेटवर असायचो तेव्हा स्वप्नील त्याठिकाणी असणाऱ्या विविध पदार्थांचा आस्वाद घ्यायला भाग पाडायचा. आणि त्यामुळे मी हळूहळू याकडे परत वळले. आणि त्यानंतर मी ज्याठिकाणी शूटिंगसाठी जाईन त्याठिकाणी त्या-त्या पदार्थांचा आस्वाद घेऊ लागले. त्यामुळे स्वप्नीलमुळे माझ्या आयुष्यातील ही गोष्ट परत मिळाल्याचं ती सांगते.
मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी हे खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी काही चित्रपट आणि मालिकांमध्ये एकत्र काम केलं आहे. मुक्ता आणि स्वप्नीलची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडते. मुक्ता आणि स्वप्नीलने मुंबई पुणे मुंबई या चियरपटाच्या दोन भागात काम केलं आहे. त्यासोबतच या दोघांनी झी मराठीवरील ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत काम केलं आहे. हे चित्रपट आणि मालिका दोन्ही प्रचंड गाजले होते. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भुरळ पाडते.