नागपूर शिक्षक मतदारसंघातील माविआचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या प्रचारार्थ चंद्रपुरात ठिकठिकाणी मेळाव्याचे आयोजन
चंद्रपूर, प्रतिनिधी : अनेक वर्षानंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याच्या वाट्याला शिक्षक आमदारपदाचा उमेदवार लाभला आहे. शिक्षक या बुद्धिजीवी वर्गाची ही निवडणूक आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राबद्दल तळमळ असलेला व शिक्षकांच्या समस्यांची जाण असलेला उमेदवार रिंगणात असल्याने अडबाले यांच्या बाजूने उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे यावेळी शिक्षक आमदार निवडणुकीत परिवर्तनाची लाट दिसून येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचे प्रचारार्थ शुक्रवारी (दि. २७) सिंदेवाही व ब्रम्हपुरी – नागभीड येथे शिक्षक मतदारांचा मेळावा आणि बैठक आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते आ. वडेट्टीवार यांनी पुढे शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारे नेतृत्व म्हणून सुधाकर अडबाले हे सर्वांना परिचित असून त्यांना महाविकास आघाडीने दिलेली उमेदवारी ही शिक्षक वर्गाला न्याय देणारी आहे, असे प्रतिपादन केले.
अनेक वर्षानंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याच्या वाट्याला शिक्षक आमदार पदाचा उमेदवार लाभला आहे. शिक्षक या बुद्धिजीवी वर्गाची ही निवडणूक आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राबद्दल तळमळ असलेला व शिक्षकांच्या समस्यांची जाण असलेला उमेदवार रिंगणात असल्याने अडबाले यांच्या बाजूने उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे यावेळी शिक्षक आमदार निवडणुकीत परिवर्तनाची लाट दिसून येत आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अडबाले यांची सरशी स्पष्टपणे दिसत असून विजयाकडे त्यांची घोडदौड सुरू आहे, असेदेखील ते यावेळी म्हणाले. यावेळी केंद्र सरकार लागू करीत असलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वपूर्ण असून यंदा परिवर्तन करण्याचा निश्चय शिक्षकांनी केला आहे.