एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्याचे दिसून आले. तसेच महाविकास आघाडी सरकार देखील कोसळले . यानंतर शिंदे गटाने भाजपबरोबर सरकार स्थापन केले. यावेळी, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, शिवसेनेच्या दोन्ही गटातील लोकांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे अशी ईच्छा व्यक्त केली मात्र, या दोन्ही नेत्यांचं मनोमिलन घडू नये अशी भाजपची ईच्छा असल्याचे म्हटले जात आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गट आणि भाजप अशा या युतीने २०२४ च्या लोकसभा , विधानसभा निवडणूक जिंकाव्यात अशी भाजपने रणनीती आखल्याचे समजते. दरम्यान,
शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला असल्याचे समोर येत आहे. येत्या १९ जुलै रोजी शपथविधीचा हा सोहळा रंगणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.