Chandrapur : जिल्ह्यातील सावली (Savli) नगरात शुद्ध पाणीपुरवठा (Pure Water Supply) व्हावा, यासाठी १२.५० कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. प्रत्येक प्रभागांमध्ये मोफत नळजोडणी (Free Water Connection) देण्यात येणार आहे. नळजोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे, अशी माहिती माजी पालकमंत्री व आ. विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगरपंचायत सामान्य फंडाच्या माध्यमातून सार्वजनिक कार्यक्रम, नाली दुरुस्ती, दिवाबत्ती सोय यासारखे कामे करते. कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशावर नगरपंचायत अवलंबून असते. स्वच्छता अभियानामध्ये (Swachhta Abhiyan) भाग घ्यायचा असेल आणि आदर्श नगरपंचायत करायची असेल, तर शंभर टक्के कराची वसुली करणे आवश्यक आहे. त्यासाठी सावलीतील शंभर टक्के कुटुंबीयांनी मालमत्ता कर (Property Tax), पाणीपट्टी कर (Water Supply Tax) भरावा असे आवाहन आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले.
सावलीकरांना चोवीस तास पाणीपुरवठा व्हावा (24X7 Water Supply) यासाठी एक्सप्रेस फिडरची (Express Feeder) निर्मिती करण्यात आली आहे. महामार्गाचे (Highway) काम सुरू असल्यामुळे दोन वर्ष शहरातील पाणीपुरवठा बंद होता. या दोन वर्षांचा पाणी कर पूर्णपणे माफ व्हावा, उर्वरित कर टप्प्याटप्प्याने भरण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना (District Collector) निवेदन देण्यात येणार आहे. सावलीत (Savli) रमाई भवन, नवीन बस स्थानकामागे बागेचे काम, पंचायत समितीच्या बाजूला सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. सिंचनाचे जवळपास पूर्ण कामे पूर्णत्वास आले आहेत. तसेच मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी सूचना नगरपंचायतीला देण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेत माजी आमदार नामदेव उसेंडी, नगराध्यक्ष लता लाकडे, काँग्रेसचे (Congress) तालुकाध्यक्ष नितीन गोहणे, शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, नगरपंचायतीचे उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार व नगरसेवक आदी उपस्थित होते.