गेल्या काही दिवसात अनेक वेळा राज्याची अस्मिता आणि महापुरुषांचा जाणीवपूर्वक अवमान काही घटनात्मक पदावर बसलेल्या लोकांकडून केला जातोय.
यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Bhagatsingh Koshyari )यांनी दोनदा असे कृत्य केले आहे त्यामुळे हे अनवधानाने केले असे मानता येणार नाही,यांच्यामागे असणाऱ्या सडक्या मेंदूचा शोध घेतला पाहिजे.
यापूर्वी देखील महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीमाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर या महाशयांनी अवमानकारक वक्तव्य करून समस्त जनतेच्या भावना दुखावल्या होत्या.
मात्र तश्याच प्रकारचे वक्तव्य पुन्हा करून राज्यातील सामाजिक वातावरण बिघडण्याचे काम या राज्यपालांनी केले आहे.हे पुन्हा अजून एखाद्या महापुरुषांचा अवमान करण्यापूर्वी यांची हकालपट्टी करणे गरजेचे आहे.आता सहन केले गेले तर या प्रवृत्ती वाढत जाणार त्यामळे हे पार्सल परत पाठविणे महाराष्ट्र हिताचे आहे.