परिसरातील नागरिकांनी मानले सुधाकर बडगुजरांचे आभार
Nashik : सिडकोत वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा आणि अपघातांस निमंत्रण देणारा डॉ. हेडगेवार नगर (त्रिमूर्ती चौक) येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर अन्यत्र स्थलांतरित झाल्याने सिडकोवासि्यांनी सुटकेचा श्वास घेतला. याकामी जातीने पुढाकार घेणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे परिसरातील नागरिकांननी आभार मानले.
नाशिकमधील सिडकोत भररस्त्यात असलेले आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे डॉ. हेडगेवार नगर चौकातील ट्रान्सफॉर्मर अन्यत्र हलवावे, यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे परिसरातील नागरिकांनी सुधाकर बडगुजर यांना घातले होते. बडगुजर यांनी तातडीने विद्युत मंडळाच्या तसेच अन्य यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा ट्रान्सफॉर्मर सुरक्षितेच्या दृष्टीने अन्यत्र हलविण्याची विनंती केली असता तातडीने सर्व सूत्रे हलली आणि हा प्रश्न मार्गी लागला. यामुळे आता त्रिमूर्ती चौक परिसरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित झाली आहे. बडगुजर यांनी नंतर समक्ष पाहणी करून या परिसरातील वाहतुकीचा आढावाही घेतला.