Udayanraje Bhosale : राज्यपालांनी स्वतः केलेल्या विधानाबाबत ते माफी मागत नाही, अशी खंत उदयनराजेंनी बोलून दाखवली.
Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराज याच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई करावी, यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या बैठकीबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांना माहिती दिली.
उदयनराजे भोसले म्हणाले, “राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत राज्यातील सर्वपक्षीय खासदारांचे एकमत झाले आहे. कोश्यारींच्या विधानाची राष्ट्रपतींनी दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र दिले आहे. मोदी याबाबत गांभीर्याने विचार करतील, ही अपेक्षा आहे. या विषयाकडे राजकारणाच्या नजरेतून पाहू नका.”
“कोश्यारींवरील कारवाईबाबत मोदींनी दखल घेतली आहे, कोश्यारींवरील कारवाईबाबत ते लवकरच निर्णय घेतील, प्रक्रियेनुसार कारवाई करतील,” असे उदयनराजेंनी सांगितले. “राज्यपालांनी केलेल्या विधानाला भाजप जबाबदार नाही,” असे उदयनराजे म्हणाले. राज्यपाल माफी मागत नाही, अशी खंत उदयनराजेंनी बोलून दाखवली.