Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यातील 16 जिल्हा परिषद सदस्य,30 पंचायत समिती सदस्य,तसेच एकूण 64 नगरपरिषद सदस्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेला समर्थन दिले.
जिल्हा परिषदेचे सदस्य व सहसंपर्कप्रमुख चितांगराव कदम यांच्या पुढाकारातून पोफळी व मुळावा परिसरातील सरपंच,उपसरपंच तसेच सहकार क्षेत्रातील अनेक समर्थक तर महागाव नगरपंचायतीचे रामराव नरवाडे यांच्या पुढाकारातून तीन नगरसेवक आणि राळेगाव नगरपंचायतीचे सभापती संतोष कोकुलवर यांनी देखील ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेला’ समर्थन दिले.
सामाजिक कार्य आणि जनतेची हिताची कामे करण्यासाठी हे सर्व पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आले आहेत.
यावेळी यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी,हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.