गेल्या २७ वर्षापासून गुजरात राज्यात भाजपची एकहाती सत्ता असून देखील बेरोजगारी हाच प्रमुख मुद्दा असावा हे भाजपा सरकारचे मोठे अपयश आहे.भारत जोडो यात्रेत मा.राहुल गांधी शेकडो किलोमीटर प्रवास करून महाराष्ट्रात आल्यावर त्यांच्यासोबत १०० किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास केल्यानंतर तेथूनच माजी मंत्री मा.आ.विजय वडेट्टीवार गुजरात निवडणुकीसाठी प्रचाराला गेले.विविध विधानसभा क्षेत्रात सभा घेण्यापूर्वी तसेच सभा झाल्यानंतर ते तेथील स्थानिकांशी संवाद साधतात.त्यावेळी तेथील नागरिक स्पष्टपणे सांगतात की इतक्या वर्ष एकहाती सत्ता दिल्यानंतर देखील ह्या भाजपा सरकारने आमचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविले नाही.यात बेरोजगारी,महागाई वीज,पाणी,शेतकऱ्यांची दुरावस्था,सरकारी कर्मचाऱ्यांची उदासीनता,गॅस सिलिंडर दरवाढ,पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले दर,तसेच प्रचंड प्रमाणात वाढलेला भ्रष्टाचार,जीएसटीमुळे कंबरडे मोडलेले छोटे व्यावसायिक आणि दुकानदार,ढासळणारी अर्थव्यवस्था,स्थानिकांच्या समस्या हे प्रमुख मुद्दे आहे,यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे,तो या निवडणुकीत दिसेल असे स्पष्टपणे जाणवत आहे.केंद्रात आणि राज्यात सत्ता देऊन देखील मूलभूत प्रश्न सुटत नसतील तर परिवर्तन करणे एवढाच एक पर्याय असतो आणि गुजरातची जनता यावेळी तो मार्ग स्वीकारतील असेच सद्या दिसत आहे.