माजी मंत्री वडेट्टीवारांनी केले सभा यशस्वी करण्याचे आवाहन
Chandrapur : राजकीय वर्तुळात सध्या चर्चेत असलेली महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभा उद्या 16 एप्रिलला नागपूर (Nagpur) येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या पटांगणावर होणार आहे. या सभेला विदर्भातील (Vidharbha) नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांतील काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेना (Shivsena) या तीनही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने हजेरी लावणार आहे.
दरम्यान उद्या होणाऱ्या या सभेबद्दल माहिती देताना माजी मंत्री व काँग्रेस (Congress) नेते आ. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, सध्याच्या भाजप (BJP) सरकारने आपल्या राज्यातील उद्योगधंदे पळवून गुजरात (Gujarat) राज्याला आंदन दिले आहे. शेतकऱ्यांना 14 तास वीज पुरवठा देवून म्हणणारे आता 8 तास सुद्धा वीज पुरवठा (Electric Supply) करत नाही. पण वीज दरवाढ करून सर्वसामान्यांसह शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. अर्थसंकल्पात ओबीसी (OBC) समाजाचा कल्याणार्थ असलेला बजेट ४०० पेक्षा अधिक कोटींनी कमी केला आहे. 70 हजार पदाची भर्ती ही सरकार आउटसोर्सिंगच्या (Outsourcing) माध्यमातून करून संविधानाने दिलेले आरक्षण संपविण्याचा घाट या सरकारने रचला आहे. समाजातील सर्व घटकांवर अन्याय करणाऱ्या या ईडी (ED) सरकारला उखडून फेकण्यासाठी ही वज्रमूठ सभा सर्वांनी यशस्वी करावी हे आवाहन करत ही सभा मागच्या सभेप्रमाणेचे यशस्वी करतील, हा विश्वास असल्याचे त्यांनी व्यक्त केले आहे.