राजा मायाळ, प्रतिनिधी ठाणे : रातोरात प्रसिद्ध होण्यासाठी तरुण काय काय करतील याचा काही नेम नाही. आता चक्क रिल बनवून प्रसिद्धी मिळवण्यासाठी किल्ल्यात आग लावल्याची घटना समोर आली आहे. वसई किल्ल्यात इन्स्टाग्राम वर व्हिडिओ बनवण्यासाठी थेट किल्ल्यातिल चर्च मध्ये आग लावण्यात आली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वसई किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. अश्या प्रकारे किल्ल्यामध्ये आग लावून व्हिडीओ बनवणाऱ्या स्थानिक तरुणावर कारवाई करण्याची आता किल्लेप्रेमींकडून मागणी होत आहे. या किल्ल्यात बालेकिल्ला, सात विविध चर्च, साखर कारखाना, प्रवेशद्वार, पुरातन मंदिर अशा अनेक वास्तू आहेत.
रिल बनवण्याच्या नादात लावली आग, पर्यटकांमध्ये खळबळ #reel #socialmedia #News18Lokmat #MarathiNews #vasai #Stunts pic.twitter.com/Cw8ipoJZzL
— News18Lokmat (@News18lokmat) May 22, 2023
तुमच्या शहरातून (मुंबई)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.