बंजारा हे नाव काढलं की शहरी माणसाच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहातं ते बांधकाम साईटवर काम करणारे मजूर आणि खूप आरसे असलेली विशिष्ट अशी वेशभूषा केलेल्या महिलांचं.
बंजारा ही एक भटकी जमात आहे. इंग्रजपूर्व काळात घोड्यावरून मिठाचा व्यापार करणारी जमात म्हणून बंजारा प्रसिद्ध होते.
मात्र कालांतराने मजूर म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर ही भटकी मंडळी स्थायिक झाली. पारंपरिक व्यवसायापासून ही मंडळी दूर गेली आणि मग या समाजानं इतर कामं करण्यास सुरूवात केली.
याच समाजातून येणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दीर्घ काळ मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले केवळ कामच नाही तर त्यांनी कृषी औदयोगीक क्षेत्रात अमुलाग्र अशी कामगिरी केली. ते हाडाचे प्रगतशील शेतकरी होते. याशिवाय शेती आणि मातीवर त्यांची निस्सीम भक्ती होती. आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले. अनेक क्रांतीकारी शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्यानंतर याच समजातून येणाऱ्या सुधाकर नाईक यांनी मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली.त्यांनी देखील देशात पहिल्यांदाच जलसंधारण खात्याची स्वतंत्र निर्मिती करून जलक्रांतीचे बीजे रुजवली.महिला आणि बालकल्याण विभागाची निर्मिती देखील सुधाकरराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत झाली. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढीसाठी सुधाकरराव नाईक यांनी मुलींचे शैक्षणिक शुल्क माफीचे तसेच उपस्थिती भत्ता सारखे कल्याणकारी योजना सुरू केल्या.
यांच्यानंतर याच बंजारा समाजातून येणारे संजय राठोड आहेत.सध्या ते राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले असून बंजारा समाजाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे.
वसंतराव नाईक,सुधाकर नाईक यांच्यासारखे काम करून समाज आणि राज्याला दिशा देण्याचे काम त्यांनी करावे अशी समाजाची इच्छा आहे.