आजपासून राज्यातील शाळा पुन्हा जोमाने सुरु झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचं शाळेच्या पहिल्या दिवशी जंगी स्वागत देखील करण्यात आलं आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चॉकलेट्स देऊन तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फुलं देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. कोरोना महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु होत्या. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच शाळा वेळेत आणि ऑफलाईन पद्धतीनं नेहमीप्रमाणे सुरु झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
आजपासून शिक्षक आणि विद्यार्थ्यांची वर्च्युअल भेट संपून प्रत्यक्ष वर्ग सुरु झाले आहेत. विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना रेनकोट, खाऊचा डबा, पाण्याची बाटली, दप्तर याबरोबरचं सॅनिटायझर आणि मास्क ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु होत्या. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच शाळा वेळेत आणि ऑफलाईन पद्धतीनं नेहमीप्रमाणे सुरु झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.