मुंबई, 12 मे : आतापर्यंत तुम्ही बरेच सॅड साँग ऐकले असतील. काही गाणी तर इतकी सॅड असतात की ती थेट काळजाला भिडतात आणि अश्रूंचा बांध फुटतो. सॅड साँग ऐकता ऐकता नकळत डोळ्यातून पाणी येतं, रडू कोसळतं. पण सध्या सोशल मीडियावर एक असं सॅड साँग व्हायरल होतं आहे, जे ऐकल्यानंतर लोकांना रडू नाही तर हसू आलं आहे.
एक असं सॅड साँग जे ऐकल्यानंतर लोकांना हसू आवरत नाही आहे. कदाचित तुम्हीही स्वतःला रोखू शकणार नाही. हे गाणंच तसं आहे की रडणाऱ्यालाही हसायला लावेल. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. असं या गाण्यात आहे तरी काय? हे ऐकण्याची उत्सुकता आता तुम्हालाही असेल. चला तर मग ऐकुयात हे सॅड साँग.
डबिंग आर्टिस्ट आकांक्षा शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे सॅड साँग गायलं आहे.
जगात हा असा एकमेव डॉग, दुसरा शोधून सापडणारच नाही; काय आहे याच्यात खास पाहा
तिने तू झुठी मैं मक्कार या चित्रपटातील बेदर्दियां हे गाणं गायलं आहे. तुम्ही ऐकले असेलच. अरिजित सिंगच्या आवाजातील हे गाणं ऐकल्यानंतर अनेक प्रेमवीरांना रडू आलं असेल. पण आकांक्षाच्या आवाजातील हे गाणं ऐकल्यावर हेच रडवणारं गाणं तुम्हाला हसवेल. कारण तिने हे गाणं हटके पद्धतीने गायलं आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आकांक्षाने हे गाणं शिनचॅच्या आवाजात गायलं आहे. शिनचॅन हे कार्टुन अनेकांना आवडतं. फक्त लहान मुलंच नव्हे तर कित्येक मोठ्या माणसांचाही शिनचॅन फेव्हरेट आहे. आपल्या खोडकरपणाने सर्वांच्या नाकीनऊ आणणारा हा शिनचॅन दुःखी झाला आणि त्याने हे सॅड साँग गायलं तर ते कसं असेल? हे आकांक्षाने गाऊन दाखवलं आहे.
Nagpur News: सूर असे जे काळजाला भिडतील, बासरीवाला शुभमचा VIDEO पाहाच
शिनचॅनच्या आवाजातील ओ बेदर्दियां हे गाणं चांगलंच व्हायरल होत आहे. या गाण्याला अनेकांनी पसंती दिली आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. शिनचॅन दुःखी न होता हे दुःखी गाणं गाऊ शकतो, तुम्ही मला दुःखातही हसवण्यात यशस्वी झालात, अशा कित्येक कमेंट या व्हिडीओवर येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.