दिवाकर सिंह, प्रतिनिधी
मुंबई, 6 एप्रिल : मुंबईतील दहिसर परिसरात काळाजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलीला आणि तिच्या आईला एका ढंपरने मागून धडक दिली. गाडीच्या धक्क्याने खाली पडलेल्या मुलीवर ढंपरचे चाक गेले. यावेळी लोकांनी ढंपर मागे घेण्याची सूचना केली तर चालकाने तो पुढे घेतल्यामुळे चिमुरडीच्या अंगावरुन संपूर्ण चाक गेले. या अपघातात या चिमुरडीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय आहे घटना?
तुमच्या शहरातून (मुंबई)
मुंबईतील दहिसर परिसरातील रस्ते नेहमी गर्दीने फुललेले असतात. आज एक महिला आणि तिच्या आठ वर्षीय मुलीला शाळेत घेऊन जात होती. महिलेच्या हातात पिशवी होती. गर्दीतून वाट काढत पुढे जात असताना एका ढंपरने मायलेकींना मागून धडक दिली. या धक्क्याने दोघीही रस्त्यावर कोसळल्या. यात मुलगी ढंपरच्या पुढच्या चाकाखाली आली. उपस्थित लोकांनी आरडाओरडा करत गाडी मागे घेण्याची सूचना केली. मात्र, चालकाने ढंपर पुढे घेतल्याने संपूर्ण चाक मुलीच्या अंगावर गेले. इतक्या वजनाचा ढंपर अंगावर चढल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला.
Video : मुंबईतील दहिसर भागात एका ढंपरने शाळकरी मुलीला चिरडलं#mumbai #accident pic.twitter.com/xMpiPOIBqj
— News18Lokmat (@News18lokmat) April 6, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.