धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 17 एप्रिल : कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून विविध कला, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत नव्हतं. आणि याच काळात महिला वर्गांना घराच्या बाहेर पडता आलं नाही. परिस्थिती सध्या शिथिल झाली असल्यामुळे मुंबईतील कुर्ला परिसरात महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दाखवला. कुर्ल्यातील श्री सर्वेश्वर मंदिराच्या पटांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवामध्ये कुर्ल्यातील 200 ते 250 महिलांनी सहभाग घेतला होता. या महिलांमधून कूर्ल्याची महाराणी हा किताब श्रावणी खोपडे हिने पटकावला.
स्थानिक स्तरावरील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच एक दिवस घराबाहेर पडून महिलांनी स्वतःसाठी जगाव याचं हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी वेशभूषा, नृत्य, होम मिनिस्टर याचबरोबर विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रथम येणाऱ्या महिलेस पेशवाई पैठणी तर द्वितीय पारितोषिक सोन्याची नथ, तृतीय पारितोषिक सेमी पैठणी देण्यात आली. तर उत्कृष्ठ पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांकास सेमी पैठणी व द्वितीय पारितोषिक चांदीची फ्रेम देण्यात आली. या महोत्सवामध्ये कुर्ल्यातील 200 ते 250 महिलांनी सहभाग घेतला होता.
तुमच्या शहरातून (मुंबई)
विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले
कोरोनामुळे गेल्या दोन अडीच वर्षांपासून महिला घरात होत्या त्यांना बाहेर पडण्यासाठी संधी हवी होती. यासाठी कुर्ला महिला महोत्सव, कुर्ल्याची महाराणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वेशभूषा स्पर्धा, खेळ असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. जिंकणाऱ्या महिलांना विविध भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं. लकी ड्रॉच्या माध्यमातून भेटवस्तू देण्यात आल्या तसेच हळदी कुंकू समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले होते, असं आयोजक मंगला नायकवडी यांनी सांगितले.
महाराणी हा किताब मला मिळाला
या खेळात सहभागी होऊन खूप आनंद झाला. नुकतीच 10 विची परीक्षा दिल्यानंतर घरात बसून कंटाळा येत असल्यामुळे आई सोबत या कार्यक्रमात सहभाग घेतला. आणि 200 ते 250 महिलांमधून कूर्ल्याची महाराणी हा किताब मला मिळाला, असं कुर्ला महाराणी किताब जिंकणारी श्रावणी भूपेंद्र खोपडे हिने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.