विनोद राय, प्रतिनिधी
ठाणे, 19 मे : राजकीय आशीर्वादाने कळव्यातील घोलाई नगरमधील कारगील परिसरात सरकारी जमिनीच्या जागेवर अनाधिकृत बांधकामे बिनधास्त उभी ठाकली होती. त्यावर वनविभागाच्या पथकाने बुलडोझर फिरवला आहे. यामध्ये जवळपास 500 हून अधिक झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या असून सरकारी जमिनीवरचे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी ह्या झोपड्या उध्वस्त करण्यात आल्या असून ही कारवाई वनविभाग आणि ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली आहे. सर्व झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्याचे ठाणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कळवा हद्दीत असलेल्या घोलाई नगर येथील कारगील नगर मध्ये गेल्या काही महिन्यापासून झोपटी माफियांनी बिनधास्तपणे झोपड्या उभारल्या होत्या. सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून कांदळवन नष्ट करून ही अतिक्रमणे उभारण्यात आली होती. या भूखंडावर वारंवार अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू होता. मागील अनेक वर्षांपासून हे चक्र सुरू असून सरकारी यंत्रणेने वेळोवेळी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. मात्र, तरीसुद्धा या जागेवर कारवाई मात्र भूमाफिया झोपडपट्टी उभारत होते. या जमिनीवर जवळपास 90 टक्के परप्रांतीयांनी अतिक्रमण केले होते.
तुमच्या शहरातून (मुंबई)
दरम्यान ठाणे वन विभागाच्या परिमंडळाने उभारण्यात आलेल्या अनाधिकृत झोपड्यांचा कार्यक्रम हाती घेतला. आणि तब्बल 500 हून अधिक झोपडपट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईला ठाणे दक्षता पथक, राज्य राखीव पोलीस दल, कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तसेच टोरेंट पॉवर कंपनीचे कर्मचारी व ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.