छत्रपती संभाजीनगर, 22 मे : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हरणाच्या पाडसाने विठ्ठलाच्या जयघोषावर ठेका धरल्याचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता बालगोपाळांनी विठूरायाच्या नामावर ठेका धरला आहे, आणि त्यांच्या शेजारीच असलेलं हे हरण देखील त्यांचं अनुकरण करून विठूरायाच्या गजरात पाऊली करत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. मात्र हा व्हिडीओ ग्रामीण भागातील असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये हरणाच्या पाडसानं विठूरायाच्या नामावर ठेका धरला आहे. विठूरायाच्या नामात बालगोपाळ तल्लीन होऊन पाऊली करत आहेत. त्यांच्या शेजारी असलेलं हे हरिण देखील त्यांच्याप्रमाणेच पाऊली करताना दिसून येत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हरणाच्या पाडसाने विठ्ठलाच्या जयघोषावर ठेका धरल्याचा हा व्हिडीओ आहे. pic.twitter.com/MOi6HY6ymC
— News18Lokmat (@News18lokmat) May 22, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.