नवी दिल्ली 08 एप्रिल : सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी कंटेंट क्रिएटर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत राहतात. अनेक कंटेंट क्रिएटर्सला एका विषयावर अनेक व्हिडिओ बनवायला आवडतात, प्रँक व्हिडिओ त्यापैकी एक आहे. 1999 साली MTV वर “MTV Bakra” नावाचा रिअॅलिटी शो प्रसारित झाला तेव्हा भारतात प्रँक व्हिडिओंचा ट्रेंड सर्वाधिक प्रचलित होता, जो सायरसने होस्ट केला होता. या शोमध्येही सेलिब्रिटींशिवाय वाटेतल्या लोकांसोबत टीम मेंबर्स काही प्रँक करायचे. यामुळे अनेकदा काही लोक अतिशय नाराज व्हायचे. यानंतर त्यांना सांगितलं जायचं की तुम्ही कॅमेऱ्यात दिसत आहात आणि ही फक्त मस्करी होती.
आजकाल प्रँक व्हिडिओ बनवणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे, तुम्हाला सोशल मीडियावर लाखो व्हिडिओ सापडतील. काही लोकांना प्रँकचा खूप राग येतो आणि ते नाराजही होतात. काही लोक व्हिडिओ शूट केल्यास कॅमेरा बंद करण्यासाठी धमकीही देऊ लागतात. बर्याच प्रकरणांमध्ये, लोक शिवीगाळ किंवा भांडण करण्यास देखील सुरुवात करतात. परंतु नुकत्याच झालेल्या एका घटनेत, एका अमेरिकन यूट्यूबरला प्रँक केल्यामुळे गोळ्या घातल्या गेल्या.
ही घटना अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे राहणाऱ्या युट्युबर टॅनर कुकसोबत घडली असून त्याच्यावर आता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेपूर्वीचा आणि नंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोळी चालवतानाचा व्हिडिओ अद्याप समोर आलेला नाही.
आता तुम्ही विचार करत असाल की प्रँक व्हिडिओ बनवून प्रकरण गोळीबारापर्यंत कसं पोहोचलं. तर, टॅनर कुक यूट्यूबवर क्लासिफाइड गून्स नावाचं स्वतःचं चॅनल चालवतो. यावर तो अनेकदा प्रँक व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याच्या चॅनलला जवळपास 43 हजार फॉलोअर्स आहेत. 2 एप्रिल रोजी टॅनर व्हर्जिनिया येथील डलेस टाउन सेंटर मॉलमध्ये एक प्रँक व्हिडिओ बनवण्यासाठी पोहोचला. तो यासाठी तो 31 वर्षीय अॅलन कोलीच्या जवळ गेला. टॅनर प्रँक करत होता आणि त्याचा मित्र दुरून त्याचं रेकॉर्डिंग करत होता. असं सांगण्यात येत आहे, की अॅलनला टॅनरचा प्रँक आवडला नाही आणि त्याने टॅनरला गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.
The moment police apprehended shooting Suspect at Dulles Town Center today pic.twitter.com/shv0cjQm8k
— VAhiphopandnews (@VAhiphopandnewz) April 2, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.