पिंपरी चिंचवड, 6 एप्रिल : चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंतीला होणाऱ्या वाकड-हिंजवडीसह तमाम मुळशी तालुक्याचे व पुणे जिल्ह्यातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हातोबा देवाचे बगाड मिरवणूक प्रसिद्ध आहे. मात्र, या यात्रेला आज गालबोट लागले. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या बगाड उत्सवामध्ये बगाडाचा शेला ज्याला शासन काठी ही म्हटलं जाते ती अचानक तुटल्याने भाविकांचां हिरमोड झाला. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
आयटी हब अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी भागात दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात बगाड उत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षी देखील आयोजित करण्यात आलेल्या बगाड उत्सवादरम्यान हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येत होती. त्याच दरम्यान बगाडावर मानकरी चढताच शेला तुटला. मात्र, या घटनेत कुणीही जखमी झाले नाही आणि मोठा अनर्थ टळला. मात्र, बगडाचा शेला एवढ्या वर्षात प्रथमच तुटल्याने पंचक्रोशीतील भाविकांमध्ये नाराजी बघायला मिळाली.
पिंपरी चिंचवडमध्ये श्री म्हातोबा देवाचे बगाड मोडल्याने भाविकांचा हिरमोड#hinjwadi #bagadyatra pic.twitter.com/4Y4h2vm5Y4
— News18Lokmat (@News18lokmat) April 6, 2023
तुमच्या शहरातून (पुणे)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.