नवी मुंबई : नवी मुंबईत एका कार चालकाने ट्राफिक पोलिसाला जवळपास २० किमी पर्यंत बोनेटवरून फरफटत नेलं. सुदैवाने यात ट्राफिक पोलिसाला कोणती दुखापत झाली नाही. पोलिसांनी आरोपी कार चालकाला अठक केलीय. तरुण सिग्नल तोडून जात असताना ट्राफिक पोलिसाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरुणाने गाडी थांबवली नाही. तेव्हा ट्राफिक पोलिस कारच्या बोनेटवर आदळला. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून ट्राफिक पोलिस कारच्या बोनेटवर कसाबसा स्वत:चा जीव वाचवताना दिसत आहे.
पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली आहे. त्याचं नाव आदित्य बेमडे असं असून तो नेरुळमध्ये राहतो. पोलिसांनी सांगितलं की तो नशेत गाडी चालवत होता. ट्राफिक पोलीस सिद्धेश्वर माळी हे कारच्या बोनेटवर अडकल्याने थोडक्यात वाचले. जवळपास २० किमी अंतर ते जीव मुठीत धरून कारच्या बोनेटवर होते. पाम बीच रोडवर असणाऱ्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. ट्राफिक पोलिस सिद्धेश्वर माळी ब्लू डायमंड जंक्शनवर रेड सिग्नल तोडणाऱ्या आणि स्कूटरला धडक देणाऱ्या कारला रोखण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा कार चालकाने गाडीचा वेग वाढवला.
धक्कादायक! नवी मुंबईत कार चालकाने ट्राफिक पोलिसाला बोनेटवर 20 किमी नेले फरफटत#NaviMumbai #ViralVideo pic.twitter.com/iKRO0l5pX9
— News18Lokmat (@News18lokmat) April 16, 2023